Chandrakant Patil meet Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Session: चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! दादांनी चॉकलेट देऊन भरवला पेढा; पाहा VIDEO

Chandrakant Patil meet Uddhav Thackrey: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर राहिले आहेत. या अधिवेशनावेळी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर राहिले आहेत. या अधिवेशनावेळी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चॉकलेट दिलं. त्याचबरोबर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात उध्दव ठाकरे आणि दानवेंची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. हि भेट कोणत्या कारणासाठी घेतली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पेढा देखील भवरला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत करत चॉकलेट भेट दिले. उद्धव ठाकरे यांच्यासह अंबादास दानवे आणि अनिल परबही यावेळी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक, विधानभवन परिसरात आंदोलन

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा परिसरामध्ये विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT