महाराष्ट्र बातम्या

आरोग्य सेवांवरून अजित पवारांकडून प्रश्नांचा भडीमार; शिंदेंचे मंत्री गडबडले

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना चांगलेच कात्रीत पकडण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत असून, विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी राज्यातील कोलमडलेल्या आरोग्य सेवांवरून प्रश्नांचा अक्षरक्षः भडीमार केल्याचे दिसून आले. मात्र, पवारांकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंतांची भांबोरी उडाली. आजच्या चर्चेवेळी अजित पवारांनी पालघरमधील जुळ्यांच्या मृत्यू आणि हत्तीरोगाच्या संबंधित अनेक प्रश्न विचारले. मात्र, याला आरोग्यमंत्री योग्य माहिती देऊ न शकल्याने विरोधक आक्रमक झाले. अखेरीस हे प्रश्न मागे ठेवावे लागले.

पवार म्हणाले की, पालघरमध्ये अजुनही योग्य आरोग्यसेवा नाही. आदिवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुर्देवाचं दुष्टचक्र कधी थांबणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. पालघरमध्ये आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला असून, जिल्ह्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत ज्यामध्ये अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचू शकलेली नाही.

बाजूला ठेवलेल्या प्रश्नांवर सोमवारी देणार उत्तर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT