Chhagan Bhujbal  esakal
महाराष्ट्र बातम्या

पावसाळी अधिवेशनात चर्चा काळी दाढी आणि पांढरी दाढी याचीच, भुजबळांची टोलेबाजी

जीएसटीवरुन मुद्दा मांडताना छगन भूजबळ आक्रमक झाले.

धनश्री ओतारी

जीएसटीवरुन मुद्दा मांडताना छगन भूजबळ आक्रमक झाले. पण यावेळी त्यांनी काळ्या पांढऱ्या दाढीवरुन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली.(Maharashtra Assembly Monsoon Session Chhagan Bhujbal GST PM Modi)

अधिवेनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, छगन भूजबळ यांनी जीएसटीवरुन मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी दाढीवरुन टोलेबाजी केली. आणि सर्वत्र एकच हशा पिकला.

डोंगर झाडीनंतर आता दाढीची चर्चा; काय म्हणाले छगन भुजबळ

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळंच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. असा टोला जिएसटी वरुन छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

जीएसटीवरुन हल्लाबोल

जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट होत आहे. एक गोष्ट सुटलेली नाही. फक्त भाषणावर तुम्ही जीएसटी लावेला नाही. सर्व सामान्यांवर फार वाईट परिणाम होत आहे. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. स्कुल चले हम जीएसटीेके साथ अशा घोषणा लोक देत आहेत.

भारतामध्ये अर्थिक मंदी नाही म्हणतात. मंदी नाही तर या सर्व गोष्टींवर जीएसटी लावण्याची गरज काय असा सवाल भुजबळ यांनी व्यक्त केला. जर तुमची अर्थव्यवस्था मजबुत आहे. श्रीलंका किंवा बांगलादेश सारखी ढासळलेली नाही. मग त्यांना आपण सवाल उपस्थित करणारच ना.

शाळा, अन्नधान्य, आणि रुग्णालयाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन वाढवलं पाहिजेल. उपमुख्यमंत्री त्यांना घेऊन जा . आणि यांना सांगा की यामधील गोष्टींवर थोड काही तरी कमी करा. संपूर्ण देशाच लक्ष तुमच्याकडे लागलं आहे. तुम्ही गंभीरतेने याची दखल घ्या असे भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT