Shinde Group Slogans Against Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा

धनश्री ओतारी

काल सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या भितीने राजा बसला घरी...अशी घोषणाबाजी करत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. युवराजांची दिशा चुकली अशी घोषणा विरोधक देताना दिसत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरेंचे पोस्टरदेखील दाखवण्यात आले आहे.(Maharashtra Assembly Monsoon Session Shinde Group Slogans Against Aaditya Thackeray)

सत्ताधारी आमदारांनी आज आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गट, भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. युवराजांची कायमच दिशा चुकली असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिशा या शब्दाल बोल्ड केलं आहे. सत्ताधाऱ्याच्या यामागचा नेमकां उद्देश काय असा सवाल उपस्थित होत आहे.

पोस्टरमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलं आहे?

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने बॅनर, घोषणांचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने 'महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज' असा बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले.

यामध्ये २०१४ ला १५१ चा हट्टा धरून युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्वासाठी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरात बसून केला कहर. सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर अशा टोमणा सत्ताधाऱ्यांनी शिवसंवाद आणि निष्ठायात्रा वरुन आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

तसेच, पुन्हा निवडणुक लढवायची देतात उसन, स्वतः आमदार व्हायला महपैर आणि दोन MLC लागते कुशन. खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपरा सत्ता गेल्यावर आता फिरतात दारेदार. जनता खोटे अश्रु पुसणार नाही. अशा शब्दात सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT