Shinde group slogan esakal
महाराष्ट्र बातम्या

कोविडच्या भितीने राजा बसला घरी...उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाची घोषणाबाजी

धनश्री ओतारी

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. नेहमी विरोधक पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करत असतात. मात्र, आज सत्ताधारी पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली आहे.(Maharashtra Assembly Monsoon Session Shinde group slogans against Uddhav Thackeray)

नेहमी विरोधक पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करत असतात. मात्र, आज सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहे. कोव्हीड घोटाळ्याप्रकरणी भाजप आक्रमक झालेत. कोविडच्या भितीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले त्यांच्या घरोघरी अशा कविता स्वरुपात भरत गोगावलेच मातोश्री विरोधात घोषणाबाजी केली आहे.

तसेच, सचिन वाजेचे खोके मातोश्री ओके. अनिल देशमुखचे खोके सिल्व्हर ओक ओके अशी घोषणा देण्यात आली. शिवसेनेने कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने पक्षाविरोधात बंड पुकारत गुवाहाटीला रवाना झाले अन् भाजपसोबत जात राज्यान नव्याने सत्ता स्थापन केली तेव्हापासून विरोधक फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी… ईडी सरकार हाय हाय… पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके… आणि आले रे आले, गद्दार आले, अशा घोषणा देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT