Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: 'पहिल्याच दिवशी कॅसिनोवर कायदा..', रोहित पवार संतापले, 'अनुभवी’ नेते म्हणत बावनकुळेंना चिमटा

राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजपासून राज्याचं हिवाळी आधिवेशन सुरू होत आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. आधिवेशन सुरू होण्याआधीच राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पेपरफुटीची प्रकरणे समोर आली होती, त्यावर भाष्य करत सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणलेल्या विधेयकावर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवारांनी काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

'राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. परंतु या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं. हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती, अशी पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी संजय राऊत यांनी कॅसिनोमधील बावनकुळेंचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना तसेच सामाजिक वातावरण बिघडलेले असताना परदेश दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी एका रात्रीत कॅसिनोमध्ये साडे तीन कोटी रुपये उडवले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.

बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करून महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊ येथे ते कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा दावा राऊत यांनी केला. मात्र राऊतांनी केलेल्या आरोपांचं बावनकुळेंनी स्पष्टपणे खंडन केलं होतं. त्यामुळे बावनकुळे चांगलेच चर्चेत आले होते.

अशातच सरकारने कॅसिनोच्या विषयावर पहिल्याच दिवशी विधेयक आणलं. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात येणार आहे, त्यावरून रोहित पवारांनी बावनकुळेंना लक्ष केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT