MLAs disqualification Verdict Sakal
महाराष्ट्र बातम्या

MLAs disqualification Verdict: 'शिवसेना शिंदेंची'; नार्वेकर यांनी दिला ठाकरे गटाला मोठा धक्का

MLAs disqualification Verdict: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. निकाल देताना नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्याच्या निकाल वाचनातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहुया...( Maharashtra Assembly speaker Rahul Narwekar gives verdict in Shiv Sena MLAs disqualification case)

नार्वेकरांच्या निकालातील महत्त्वाचे मद्दे--

१. ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.

२. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे

३. २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे.

४. २१ आणि २३ जून २०२२ शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहे. या दिवशी शिंदे गट हाच खरी शिवसेना.

५. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे.त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते

६. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे. एकनाथ शिंदे यांचे गटनेते पदी नियुक्तीही वैध

७. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे

८. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणत्याही नेत्याच्या हकालपट्टीचा अधिकार नाही

९. शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये १९मधील १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत.

१०. २३ जानेवारी २०१८ रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT