Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"कोरोनाबाबत पंतप्रधानही गंभीर, तुम्ही बोलणं झाल्यावर तरी मास्क लावा"

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांचं सर्व आमदारांना आवाहन.

सुधीर काकडे

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. सभागृहात वेगवेळ्या मुद्यांवरून खडाजंगी सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. 'पंतप्रधान मोदीसुद्धा कोरोनाच्या संकटाचा गांभीर्यानं विचार करत आहेत. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. ठराविक लोक सोडले तर कुणीही इथं मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललंय ते पाहतोय' असं म्हणत अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला.

काहींची अडचण आहे की, मास्क काढल्याशिवाय प्रश्न मांडता येत नाही. पण किमान बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. परदेशात मृत्यूची संख्या वाढत आहे. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. माझ्यासारख्याने मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा. आपण वेगवेगळ्या माध्यमात दिसत असतो. आता कोरोनाचा भाऊ, नवा विषाणू समोर आलाय. त्यामुळे काळजी घ्या आणि मास्क लावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT