Devendra fadnavis  Devendra fadnavis
महाराष्ट्र बातम्या

"राजाचा पोपट मेला पण,..." मुस्लीम आरक्षणावरून फडणवीसांची टोलेबाजी

Maharashtra assembly winter session 2021: धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध असल्याचंही केलं स्पष्ट.

सुधीर काकडे

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. नेहमी प्रमाणं यंदाही अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरूनच आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी आरक्षणाची मागणी करणाऱ्या नवाब मलिकांना धारेवर धरलं. मुस्लीम आरक्षण देता येत नाही असं नवाब मलिकांनी स्पष्ट केल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. तसेच धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं देखील ते म्हणाले. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी एक खास गोष्टही सांगितली.

आमच्या काळात मुस्लीम आरक्षणासाठी यांनी फार आंदोलनं केली, मात्र राजकीय हेतुनं प्रेरीत होऊन त्यांनी ती आंदोलनं केली होती. आता सत्तेत आल्यावर यांची भाषा बदलली. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही हे नवाब मलिकांनी स्पष्ट केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना धारेवर धरलं. आम्ही सांगत होतो की, गरीब मुस्लीम समाजाला ओपनमधून आरक्षण मिळत होतं. त्याची माहिती देखील आम्ही दिली होती असंही ते पुढे म्हणाले.

या मुद्दयावर पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. राजाचा पोपट मेलेला असतो, मात्र ते सांगेल राजाला कोण? मग कोणी म्हणतं मान वाकडी झाली, कोणी म्हणतं तो हालचाल करत नाही, कोणी म्हटलं तो खात पीत नाही...मात्र कोणीही सांगत नाही की पोपट मेला. मात्र आज नवाब मलिकांनी अखेर सांगून टाकलं की, राज्यात मुस्लीम आरक्षण मिळू शकत नाही. तसंच पुढे बोलताना देवेद्र फडणवीस असंही म्हणाले की, धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोध आहे. यांनी केंद्रावर लोटण्याचा प्रयत्न केला, मात्र आता अंगावर आल्यानंतर यांनी ही गोष्ट स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT