Anil Parab-Nitesh Rane google
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Assembly : नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये सभागृहातच हमरीतुमरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज दुसरा दिवस आहे. आज देखील विरोधकांनी सकाळीच पायऱ्यांवर निर्दशने केली. परिवहन मंत्री अनिल परब (Shivsena Minister Anil Parab) आणि भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्यामध्ये सभागृहातच हमरीतुमरी झालेली पाहायला मिळाली. नितेश राणेंच्या विरोधात शिवसेना आधीच आक्रमक आहे. त्यातच आज अनिल परब अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत होते. त्यात मध्येच नितेश राणे बोलले. त्यानंतर अनिल परबांचा आवाज चढला आणि त्यांनी नितेश राणेंना सुनावले. परब म्हणाले, मला मंगलप्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना उत्तर आधी देतो. तुम्ही तुमच्या जागेवर जा. जिथे जागा आहे तिथे जाऊन बसा. त्यानंतर नितेश राणे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अध्यक्षांनी हस्तक्षेप करत नितेश राणेंना जागेवर बसण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंचा सीट क्रमांक सांगा, अशी विचारणा अध्यक्षांना केली. सीट नंबर तुम्ही नाहीतर आम्ही देतो, असं फडणवीस म्हणाले.

एसटी संपात 57 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का? असा प्रश्न भाजप आमदार श्वेत महाल्ले यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री म्हणाले, ''एसटीच्या 57 कर्मचारी आत्महत्या केली. त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत माहिती घेत आहोत. आत्महत्या कशामुळे झाल्या? हे तपासणार जाणार असं अनिल परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

SCROLL FOR NEXT