Ajit Pawar On Chhatisgarh Dharm Sansad Sakal
महाराष्ट्र बातम्या

गांधीजींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर होणार कारवाई - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अकोल्यातील धार्मिक नेता कालीचरण यांनी छत्तीसगडमधील धर्म ससंदेत (Chhatisgarh Dharm Sansad) महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. तसेच गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं कौतुक केलं आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2021) उमटले. कालीचरण यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy CM Ajit Pawar) यांनी विधानसभेत सांगितले.

''अकोल्यातील धार्मिक नेता कालीचरण यांनी महात्मा गांधींना शिव्या घातल्या. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करायला हवी. महात्मा गांधींना शिवीगाळ करत असेल तर हा अपमान सहन करणार नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नवाब मलिकांनी केली. त्यानंतर नाना पटोले यांनीही संबंधित व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली. तसेच मलिक आणि नाना पटोलेंच्या मागणीला पाठिंबा देत विजय वडेट्टीवार म्हणाले, ''देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आयुष्य वाहिलं त्यांना अशा पद्धतीने शिवीगाळ अपमान होत असेल तर आपण सभागृहाने आदेश देऊन अशा व्यक्तीवर कडक कारवाईची करावी.

दरम्यान, तुमचे सरकार आहे, तुम्ही कारवाई करा, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांची दखल यासंदर्भात माहिती घेऊन शंभर टक्के कठोर कारवाई करू, असं सांगितलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

छत्तीसगढमधील रायपूर येथे धर्म संसद बोलावण्यात आली होती. यामध्ये देशातील २० पेक्षा अधिक धार्मिक नेते सहभागी झाले होते. काही धार्मिक नेत्यांनी हिंदू राष्ट्रासाठी हातात हत्यारे घेण्यास सनातनी हिंदूंना सांगितले. तसेच अकोल्यातील धार्मिक नेता कालीचरण यांनी ''महात्मा गांधींची हत्या झाली ते बरं झालं. हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना नमस्कार'' असं म्हणत गांधीजींबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी देखील कालीचरण यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच महात्मा गांधींविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण यांच्याविरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT