महाराष्ट्र बातम्या

Winter Session : जयंत पाटील निलंबित असताना अजित पवारांनीही उच्चारला 'तो'च शब्द; कारवाई होणार?

अजित पवारांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात असंसदीय शब्द उच्चारल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील निलंबित झाले आहेत. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही तोच शब्द उच्चारला आहेत. त्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवार टीका करत होते. राज्याच्या इतर मंत्र्यांचे कार्यक्रम आणि त्यावर होणारा खर्च याबद्दलही अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, "सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाचा कार्यक्रम करायचा म्हणून १५-३० कोटी गोळा करण्याचं काम सुरू आहे. पत्रिका खपवण्यासाठी पैसे वाटणं सुरू आहे."

अजित पवार पुढे म्हणाले, "चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, फू बाई फू, असे अनेक कार्यक्रम असतात, ते घ्यायला करोडो रुपये लागतात. असल्या कार्यक्रमातून वसुली सुरू आहे. या महोत्सवासाठी कृषी खात्याला वेठीस धरलं आहे. ही बाब गंभीर आहे."

अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. पवार म्हणाले, "हा भ्रष्टाचार चाललेला नाही का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून काय काय सुरू आहे. सतत शिवीगाळ सुरू आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात, दारू पिता का म्हणून. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. "

याच 'निर्लज्ज' शब्दामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं होतं. आता अजित पवारांनीही हाच शब्द वापरला आहे. त्यावर आता कोणती कारवाई होते हे पुढच्या काळात पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

SCROLL FOR NEXT