महाराष्ट्र बातम्या

मुंबईतून आणखी एक संशयीत दहशतवाद्याला अटक

नामदेव कुंभार

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून मध्यरात्री उशीरा आणखी एक संशयीत दहशतवाद्याला अटक केली आहे. जाकीर असं या संशयीत दहशतवाद्याचं नाव आहे. जोगेश्वरी येथून रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नागपाडा एटीएस कार्यालयात चौकशीसाठी आणलं होतं. चौकशीनंतर त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचं वृत्त आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईसह देशभरातून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. महाराष्ट्रासह सहा राज्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचणार असल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली होती. यामध्ये मुंबईत सायन-भागात राहाणाऱ्या जान मंहम्मद या दहशतवाद्याचा समावेश होता.

सायनच्या जान मंहम्मद आणि जाकीर यांच्यात काही कनेक्शन आहे का? याचा तपास मुंबई पोलिस गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र एटीएस घेत असल्याचं वृत्त आहे.

तीन दिवसांपूर्वी जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एकाच वेळेस महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली होती. जान मोहम्मद हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्याने त्याची महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत आता त्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यामध्येच आता आणखी एका दहशदवाद्याला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT