asha bhosale 
महाराष्ट्र बातम्या

Breaking : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

सकाळ डिजिटल टीम

आपल्या अष्टपैलू गायकीनं तमाम संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले (Asha Bhosale) यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून याची घोषणा झाली आहे. राज्य सरकारकडून 1996मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. तर, दुसरा पुरस्कार 1997मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशाताई, मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आशाताईंविषयी थोडक्यात

  • आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली जिल्ह्यात झाला
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील गायनासाठी त्यांना 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
  • दोन वेळा त्यांनी राष्ट्रीय पुस्कारावर आपली मोहोर उमटवली होती
  • 2008 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • 2008मध्येच त्यांना पद्म विभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
  • ओ.पी. नय्यर, खय्याम, संगीतकार रवी, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, इलयराजा यांच्यापासून ए. आर. रेहमान, अशा दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा कहर! १० जणांना चिरडले; २ ठार, ८ जण जखमी

IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Latest Marathi News Update : भीषण अपघात! नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Nanded: गुंठेवारी प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार ऑनलाइन; नांदेड मनपाची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप, गैरप्रकारांनाही आळा बसणार

भुदरगडमध्ये मॅग्नेटिक पॉइंट? उताराऐवजी चढाच्या दिशेनं जाते न्यूट्रल गाडी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT