appasaheb dharmadhikari Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bhushan 2022: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर

काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Appasaheb Dharmadhikari Awarded With 2022 year Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. 

२५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले.

१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेल्या ३० वर्षापासून निरुपण करत आहेत. तसेच अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या असून, आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही ते करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, स्मशान आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहीरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात.

विशेष म्हणजे, यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT