HSC Result 2023 Esakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Result 2023: बारावीच्या निकाल घटला! राज्यात तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी९३.३४ टक्के इतकी आहे.

राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.

सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.

सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.

निकालाची वैशिष्ट्ये:

- ९३.४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

- एकूण विषय संख्या : १५४

- १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांची संख्या : २३

शाखानिहाय निकालाची टक्केवारी

शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : ९६.०९ टक्के

कला : ८४.०५ टक्के

वाणिज्य : ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

.....................................................................................................................................

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर : ९०.३५ टक्के

औरंगाबाद : ९१.८५ टक्के

मुंबई : ८८.१३टक्के

कोल्हापूर : ९३.२८टक्के

अमरावती : ९२.७५टक्के

नाशिक : ९१.६६ टक्के

लातूर : ९०.३७टक्के

कोकण : ९६.०१टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT