पश्चिम बंगालमधील रामनवमी हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धार्मिक मिरवणुकीत जातीयवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी 16 जणांना अटक केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या खुलाशांच्या आधारे आणि तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या व्हिडिओ फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे, NIA ने ही माहिती दिली.
राजौरी हल्ला 2023 प्रकरणी NIA ने पाचपैकी तीन पाकिस्तानी नागरिकांवर आरोपपत्र दाखल केले
दिल्ली सदर बाजार परिसरात एका गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर. आग विझवण्याचे काम सुरू आहे. तपशीलांची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम ठोकला. येत्या २ दिवसांत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गझलसम्राट पंकज उधास यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट शेयर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात त्यांनी गझल सम्राट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
एनी राजा यांची केरळच्या वायनाड मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी केली जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. CPI चे सरचिटणीस डी राजा यांनी याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. इंडिया आघाडीचं जागावाटप अद्याप झाल नसताना CPI कडून मात्र महत्वाच्या मतदार संघात उमेदवारी जाहीर
आपने उद्या अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. यावेळी लोकसभेतील उमेदवारांच्या नावावर शिक्कोमोर्तब होण्याची शक्यता आहे.
पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभीमूवर ऑस्ट्रेलियाने रशियन तुरुंग अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मरयम नवाझ यांना संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून नव्या कार्यालयाची मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. विधी मंडळात पक्ष कार्यालय देण्यात यावं, यासाठी अध्यक्षांना पत्राद्वारे मागणी करण्यात आलीये. सध्या दोन्ही गटातील आमदार एकाच कार्यालयाचा वापर करत आहेत.
जरांगेंच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे.
मनिष सिसोदिया यांना तुरुंगवास होऊन एक वर्ष झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांना अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत
यवतमाळमध्ये दिनदयाल उपाध्याय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येणार आहेत.
विधान परिषदचे २१ आमदार जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. गुरूवारी १० आमदारांचा निरोप समारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिक्त होणाऱ्या २१ जागाचं भवितव्य विधानसभा निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.
विधान परिषदेत पून्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार पक्षांतर करण्याची शक्यता आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले अनेक आमदार या यादीत असल्याने हा मुददा निकाली काढला जाईल.
जरांगे पाटलांमुळे मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम होत आहे. हे त्यांना समाजत नाहीये असे बारस्कर महाराज म्हणजे.
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जारांगेंना १०० जन्म घ्यावे लागतील त्यांनी वापरलेली भाषा योग्य नाही असे आमदार नितेश राणे म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते असे नाना पटोले म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स बजावल्यानंतरही ते ED हजर राहणार नाहीत असे म्हटले जात आहेत
मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये दाखल झाले आहे. लोकसभेच्या ९ जागांचा ते आढावा घेतील.
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्कूबा डायव्हिंगवरुन निशाणा साधलाय. देशावर जेव्हा संकट येतं, तेव्हा मोदी फिरायला जातात, असा टोला त्यांनी लगावला.
ज्ञानव्यापी मशीद परिसरातील हिंदू पक्षाला पूजा करण्याला परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाल अलाहबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मावळमधील पवना धरणात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयांक उपाध्याय असं मृत्यू झालेल्या संगणक अभियंता तरुणाचं नाव आहे. मयांक हा मित्रांसह पवना धरणात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील विभागातील सर्व आगारातील सर्व वाहतूक तात्पुरत्या बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे. एसटी प्रशासन पोलिसांच्या संपर्कात आहे. वाहतूक सुरू करण्याबाबत पाठवुरावा केला जात आहे.
मनोज जरांगे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी गावकरी, मराठा समाजांतील व्यक्तींना घरी जाण्याचे आवाहन केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर एक वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह एकूण पाच जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. संचारबंदीमुळे मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीकडे रवाना झाले आहेत. संचारबंदी उठवा
आजच्या आज सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठी नाराजी पसरली आहे, मराठा समाजाने शांत रहावं. असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
पोलिसांना त्रास देऊ नका. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही, अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचं कारण काय आहे. सर्व आंदोलकांनी शांत रहावं, २ तासांमध्ये निर्णय घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. सोमवार २६ आणि मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.