Maharashtra Budget 2023  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तब्बल 300 कोटी, शिवराज्याभिषेकासाठी 350 कोटींची तरतूद

राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या सध्याची शिवसेना आणि भाजपा सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं हे 350 वं वर्ष असून या महोत्सवासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2023 : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या सध्याची शिवसेना आणि भाजपा सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे.

गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रथमच विधिमंडळात अर्थसंकल्प मांडत आहेत.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधीमंडळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली.

अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं हे 350 वं वर्ष असून या महोत्सवासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आंबेगाव (पुणे) इथं छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, शिवाय मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथं शिवचरित्रावरील उद्यानांसाठी 250 कोटींची तरतूद केली आहे.

याशिवाय, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय आणि शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT