Maharashtra Budget 2023 Live sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत फडणवीसांची घोषणा; आता...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यंदाचा अर्थसंकल्प अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असून हा अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. यामध्ये अनेक घोषण करण्यात आल्या.

यामध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला-आदिवासी-मागासवर्ग- ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास यावर अर्थसंकल्प आधारित आहेत.

शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना आता एक रुपयांत पीकविमा देण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी पुढील तीन वर्षात ३० टक्के वीज वाहिन्यांचे सौरउर्जेत रुपांतर करण्यात येणार आहे. या ९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

दरम्यान प्रलंबित ८६ हजार कृषी पंपधारकांना तत्काळ वीज जोडण्या देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याआधीच शेतकऱ्यांच्या सन्माना निधीत वाढ कऱण्याची घोषणाही फडणवीसांनी केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT