MLA Saroj Ahire Sakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session 2023 : सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर शिंदे सरकारला जाग; तात्काळ सुधारला हिरकणी कक्ष

आपल्या बाळासह आलेल्या सरोज अहिरे यांनी काल विधान भवनातल्या असुविधेबद्दल तक्रार केली होती.

सकाळ डिजिटल टीम

आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन विधानभवनात अधिवेशनासाठी आल्या होत्या. या वेळी मुंबई विधान भवनामध्ये आपल्या बाळाला ठेवण्यासाठी हिरकणी कक्षाची चांगली व्यवस्था नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. राज्य सरकारने लगेचच या तक्रारीची दखल घेत हिरकणी कक्ष सुधारला आहे.

हिरकणी कक्ष आता साफ करण्यात आला असून तिथे पलंगाची सोय करण्यात आली आहे. शिवाय सोफा आणि पाळणाही बसवण्यात आला आहे. तसंच काही खेळणीही या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. आमदार सरोज अहिरे यांनी सरकारच्या या कृतीचं स्वागत केलं आहे

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

माध्यमांशी बोलताना सरोज अहिरे म्हणाल्या, "माझ्या तक्रारी ची दखल राज्य सरकारने घेतली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानते. माझ्या प्रमाणे इतर महिलांसाठी हिरकणी कक्ष उभे करावे, अशी अपेक्षा. तेरा हुवा मेरा कब होगा असं सध्या आहे. सर्वच महिला वर्गासाठी हिरकणी कक्ष उभे करावे ,अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी आठ मार्चला महिला दिवस आहे त्या दिवशी केली तर बरं होईल.

अहिरे पुढे म्हणाल्या, "माझं बाळ अंगावर पीत असल्याने त्यामुळे मी त्याला इथे घेऊन आले पण सुविधा नसल्याने समस्या येत होत्या. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष घातलं त्याबद्दल आभार व्यक्त करते हिरकणी कक्षात पलंग दिलाय ,सोफा व पाळणाही दिलाय, चांगली सोय केलीय. पण हा विषय माझा विषय होता तो सुटला. पण अनेक महिला काम करत असताना हा प्रश्न उपस्थित होतो तो लोकप्रतिनिधींनी सोडवावा. महिलांचं दुःख काय असतं हे मला कळतंय त्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. इतर महिलांची सोय कधी राज्यसरकार करणार याकडे लक्ष आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT