Maharashtra Budget 2023 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2023: 'अजितदादांच्या पंचसूत्रीवर फडणवीसांच बजेट'

राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असून, राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. दरम्यान, विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत अजितदादांच्या पंचसूत्रीवर फडणवीसांच बजेट असल्याचे म्हटलं आहे. (Maharashtra Budget 2023 rohit pawar Ajit Pawar criticize Devendra Fadnavis panchamrit goals )

'अजित पवार यांनी मविआ सरकारच्या काळात गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी याचा उत्तम दाखला दिला होता.

Maharashtra Budget 2023 : सर्वसामान्यांच्या हातात काय पडले? अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे एका क्लिकवर

त्याच संकल्पनेचा संदर्भ घेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात सप्तर्षी संकल्पना वापरली आणि गेल्या वर्षी अजितदादांच्या पंचसूत्रीवर टीका करणाऱ्या फडणवीस साहेबांनी आज त्याच संकल्पनेचा आधार घेतला.' अशा आशयाचे ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

रोहित पवारच नव्हे तर विरोधक पक्षनेते अजित पवार यांनी, आमच्या अर्थसंकल्पातील बऱ्याचशा बाबी फडणवीसांच्या अर्थसंकल्पात असल्याचा दावा केल आहे.

फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला...

  1. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

  2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

  3. भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

  4. रोजगार हमीतून विकास

  5. पर्यावरणपूरक विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसलं व्यसन नाही, तंदुरुस्त अन् आनंदी आयुष्य; तब्येत बरी नाही मेसेज केल्यानंतर १० मिनिटात सहकाऱ्याचं निधन, बॉसला धक्का

Panchang 15 September 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्र वाचावे व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Updates : पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर, स्थानिक शाळा प्रशासनाचा निर्णय

BJP National President J. P. Nadda: भाजप जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा; 'दिलेली आश्‍वासने पाळली'

Pune Crime : पुण्यात पीएमपी बसस्थानकांवर दोन महिलांचे सोन्याचे दागिने चोरी

SCROLL FOR NEXT