Maharashtra Budget 2024 education esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : बार्टीच्या धर्तीवर आर्टी अन् कौशल्य विकासावर भर, अजित पवारांच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी या ८ घोषणा

शिक्षणात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, बार्टीच्या धर्तीवर आर्टी आणि कौशल्य विकासावर भर

Shraddha Kolekar (श्रद्धा कोळेकर)

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी उच्च तसेच शालेय शिक्षणासाठी तरतुदी जाहीर केल्या. सन २०२४-२५ च्या अर्थ संकल्पामध्ये एकूण खर्चासाठी ०६ लाख ५२२ कोटीची तरतूद करण्यात आली. तर शिक्षणासाठी या खालील तरतुदी जाहीर केल्या आहेत..

शैक्षणिक तरतूद २०२४-२५

१) वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय

२) जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालय

३)नागपूर येथील एम्सच्या धर्तीवर पुण्यातील औंध येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था सुरु करण्याचा विचार

४) मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना होणार

५) मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळांमार्फत मुदत कर्ज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल

कलाम शैक्षणिक कर्ज व सूक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी ३० कोटी वरून ५०० कोटी रुपये

६) वरळी मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन

७) कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण भिजला २ हजार ९८ कोटी रुपये तर शालेय शिक्षण विभागाला २हजार ९५९ कोटी रुपयांची तरतूद

८) राज्यात नवीन २ हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT