nana patole and vijay wadettiwar sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : ठिगळ लावलेला फसवा अर्थसंकल्प; विरोधकांची टीका

‘अर्थसंकल्पात कोणत्या विभागवर निधीचा उल्लेख नसलेला राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे,

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - ‘अर्थसंकल्पात कोणत्या विभागवर निधीचा उल्लेख नसलेला राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली. फसव्या योजनांची ठिगळं लावलेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला असल्याची टिप्पणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सरकारची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाबाबत यात काहीही स्पष्टता नसल्याचे पटोले यांनी नमूद केले. ‘तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षांनीही केली होती. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या पंधराशे रुपये देण्याची घोषणी केली असली तरी महागाईत एवढ्या कमी पैशात काय होणार? काँग्रेसच्या न्यायपत्रात महिलांना आठ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन होते. त्याची नक्कल अजित पवार यांनी केली असली तरी ती त्यांनी करता आलेली नाही,’ अशा शब्दात पटोले यांनी खिल्ली उडवली आहे.

‘दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिल होतं. हे काम या सरकारने चोख बजावलं आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्डयात घातले आहे. हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.

पटोले म्हणाले...

  • राज्याची अशी दयनीय परिस्थिती असताना महायुती सरकार जनतेला गुलाबी स्वप्ने दाखवत आहे

  • गॅस, पेट्रोल व डिझेलच्या करातून १० वर्षे जनतेला लुटले आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील कर कपातीचे गाजर दाखवले आहे

  • निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणांचा पाऊस आहे अंमलबजावणी शून्य असणार आहे

  • लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा दारुण पराभव केल्याने चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भितीने घोषणांचा पाऊस पाडला आहे.

वडेट्टीवार म्हणाले...

  • महाभ्रष्टाचारी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा जाहीरनामाच सादर केला आहे

  • महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे

  • अर्थसंकल्पाच्या आडून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न म्हणजे हा अतिरिक्त संकल्प आहे

  • महायुती सरकारने शेवटचा हात मारून सरकारी तिजोरी साफ केली आहे

  • स्वत:चे खोके भरून झाल्यावर जनतेसाठी काहीतरी केल्याचा केविलवाणा प्रयत्न

  • राज्यात महिलावर अत्याचार वाढले. गरीब महिलांना सरकारने फाटक्या साड्या वाटल्या. याचे प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली

  • भगिनींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT