Ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2022: 60 हजार कृषि पंपांना वीज जोडणी देणार!

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे यंदाचा २०२२-२३ वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधीमंडळात सादर करत आहेत. यामध्ये त्यांनी कृषि क्षेत्रातील (Agriculture) पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केल्याची घोषणा केली आहे. यामध्ये यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेततळ्यांसाठी अनुदान, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज,कृषि पंपांना वीज जोडणी देणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

२० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार

अजित पवार अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. ६० हजार कृषि पंपांना वीज जोडणी देणार असल्याची ही घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.याचा फायदा राज्यातील तब्बल २० लाख शेतकऱ्यांना होणार असून, त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान

  • १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र

  • ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देणार

  • पीक कर्ज वाटपात वाढ करणार

  • येत्या दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

  • कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT