ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्योगांसाठी विशेष सवलत देणार, इनोव्हेशन हब उभारणार - अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2022-23 साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2022-23 साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असून, या अर्थसंकल्पात राज्यातील उद्योगांसाठी विशेष सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्याशिवाय राज्यात नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. याशिवाय संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी यासाठी इनोव्हेशन हब सुरू करण्यात येणार असून प्रत्येक विभागात स्थापना होणार असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात राज्यातील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्यानंतर निर्बंध शिथिल केल्यानंतर हे क्षेत्र आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. तसेच उद्योग आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र 2021-22 च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी 500 कोटी रुपये खर्चून इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके मुंबई पोलिसांच्या ताब्यात? चहाच्या निमित्ताने मरीन ड्राईव्ह ठाण्यात नेले अन्...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 ऑक्टोबर 2026

Sugar Prices: साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! साठेबाजीला बसणार आळा; विक्रेत्यांना किती साखर साठवता येईल?

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT