Budget Session 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session 2023: गॅस दर वाढीवरून विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर मांडली चूल

रुपेश नामदास

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. सरकार विरोधात विरोधी पक्ष सतत आक्रमक होताना दिसत आहे. आज देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले.

आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईच मविआकडून निषेध करण्यात आला. या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय, खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले,बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

अमृता फडणवीस यांनी डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा गाजला

यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावर एक बातमी आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी म्हणजेच त्यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात एक बातमी आली आहे. आम्हाला सभागृहाला माहिती हवी आहे की या प्रकरणात सत्यता काय आहे. सर्वांना समजला पाहिजे की, हे नेमकं काय प्रकरण आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

Akola Crime News : अक्षय नागलकर हत्याकांडातील आणखी चार आरोपींना अटक; ‘एलसीबी’ची मोठी कारवाई...

Latest Marathi News Live Update : मोहोळांच्या राजीनाम्यासाठी धंगेकरांचं मोदींना साकडं!

SCROLL FOR NEXT