Namita Mundada Sakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session 2023 : अहिरेंपाठोपाठ भाजपा आमदार नमिता मुंदडाही २ महिन्यांच्या बाळासह कर्तव्यासाठी दाखल

सरोज अहिरे यांच्या नंतर नमिता मुंदडा बाळाला घेऊन विधिमंडळात

सकाळ डिजिटल टीम

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आमदार सरोज अहिरे. त्यांच्यानंतर आता आणखी एक आमदार चर्चेचा विषय ठरत आहेत.

अहिरेंच्या नंतर भाजपा आमदार नमिता मुंदडा याही आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह विधिमंडळ कामकाजात सहभागी झाल्या. त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. तसंच त्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी तिथल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था त्यांनी दाखवून दिली होती. त्यानंतर तिथल्या हिरकणी कक्षामध्ये तात्काळ सुधारणा करण्यात आल्या. अहिरे यांच्या पाठोपाठ आता भाजपा आमदार नमिता मुंदडा याही आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह विधानभवनात आल्या आहेत.

कोण आहेत नमिता मुंदडा?

नमिता मुंदडा या बीडच्या आमदार आहेत. पूर्वी त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी त्यांची पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर लगेचच मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सासूबाई विमल मुंदडा या राष्ट्रवादीमध्ये असून त्या राज्याच्या माजी मंत्री होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT