Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session  
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : 'रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला...'सभागृहात अजित पवारांनी सरकारला झापलं

सकाळ डिजिटल टीम

एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्य शासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलच खडसावलं. (Maharashtra Budget Session Ajit Pawar St Worker Suspension advertisement )

सभागृहात आज जाहिरातींमुळे एसटी कर्मचाऱ्याला निलंबन केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावरुन अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

Eknath Shinde : "दादा, पहाटेच्या शपथविधीच्या कथा सुरस आहेत, एक-दोन मला फडणवीसांनी सांगितल्यात"

काय म्हणाले अजित पवार?

मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राज्य शासनाची जाहीरात, भंगार, तुटक्या, फुटक्या, एसटी बसवर लावण्यात आल्याचं छायाचित्र दाखवले होतं. “राज्य शासनाकडून सुरु असलेली जाहीरातींवरची उधळपट्टी कमी व्हावी आणि तो निधी एसटीच्या सुधारणांसाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, खर्च व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही घडले नाही,” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

या जाहिरातीनंतर भंगार एसटीची सुधारणा करण्याऐवजी उलट, सरकारने भूम एसटी आगाराचे वाहन परीक्षक डी. बी.‎ एडके, एस. एन. हराळ, ए. यु. शेख‎ या तिघांना निलंबित केलं. खिडक्या नसणारी‎ एसटी बस फेरीसाठी बाहेर‎ काढण्यास कारणीभूत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला.

HSC Exam 2023 : पुन्हा म्हणतात, दादा बोलतात! पेपर फुटीवरुन अजित पवारांचा सभागृहात संताप

सरकारचा हा निर्णय म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’,” अशी टीका अजित पवारांनी अजित पवार यांनी केली आहे. तसेच, निलंबन मागे घेण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.

या प्रकरणात निलंबित एसटी कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही. त्यांचं निलंबन तातडीनं मागे घेण्यात यावं. त्याप्रमाणंच, इतरांवर सुरु करण्यात आलेली कारवाईही थांबवावी. कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याऐवजी सरकारने एसटीच्या ताफ्यात असलेल्या बसच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे. देखभालीवर लक्ष द्यावे. अशा कडक शब्दात अजित पवारांनी सरकारला सुनावलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT