नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.”
राज्य मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली असून काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. १९९५ पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. बिल्डर म्हणूनही त्यांची ओळख आहे.
शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री म्हणून त्यांनी याआधी काम केलं आहे.
२०१४ पासून आमदार असणारे अतुल सावे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी याआधी अनेक खाती सांभाळली आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सध्या त्यांच्यावर शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.
अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असून या पार्श्वभूमीवर त्यांचा पत्ता कट केला जाईल असं बोललं जात होतं. अब्दुल सत्तार २००९ पासून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.
रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००९ पासून ते आमदार आहेत. कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. २०१९ मध्ये मंत्रीपदाची संधी हुकल्यानं ते नाराज होते.
उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता ते शिंदे गटाच्या पाठीशी आहेत. गेल्या सरकारमध्ये त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.
सलग पाचवेळा आमदार राहिलेल्या संदीपान भुमरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते सुरेश खाडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे. २००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
संजय राठोड यांना संधी देण्यात आली असून शपथ घेतली आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्याने त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने त्यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं होतं. संजय राठोड यांचा समावेश केल्याने भाजपामधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४ पासून सलग आमदार असणाऱ्या दादा भुसे यांना कृषी खात्याचा अनुभव आहे.
जळगाव मतदारंघातील आमदार गुलाबराव पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जबाबदारी होती. एकनाथ शिंदेंना सर्वात प्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील होते.
गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. ते सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बंदूक दाखवल्याने वाद निर्माण झाला होता.
विजयकुमार गावीत यांनी शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी मराठीत त्यांचं अभिनंदन केलं.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. भाजपाकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोन करुन मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं सांगण्यात आलं होतं. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनुभवी नेत्याचा समावेश झाला आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेते राजभवनात दाखल झाले आहेत.
शिंदे गटातील 9
दादा भूसे
संदीपान भूमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
दीपक केसरकर
शंभुराजे देसाई
अब्दुल सत्तार
गुलाबराव पाटिल
संजय राठौड
भाजप 9 मंत्री
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटिल
राधाकृष्ण विखे पाटिल
गिरीश महाजन
अतुल सावे
विजयकुमार गवित
मंगलप्रभात लोढा
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता जवळपास कट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी, आत्ताच्या विस्तारात तुमचं नाव नसेल. मात्र पुढच्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात तुमचं नाव निश्चित असेल. सध्या तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही," असे स्पष्ट संकेत संजय शिरसाट यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नऊ भाजप कडून तर नऊ शिंदे गटाकडून असे १८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
शपथ घेणारे मंत्री
अब्दुल सत्तार
दादा भुसे
सुरेश खाडे
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
विजय कुमार गावित
संजय राठोड
गुलाबराव पाटील
तानाजी सावंत
दीपक केसरकर
सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
शंभूराज देसाई
संधी न मिळाल्याने शिवेसना-भाजपाचा कर्मठ कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. आज ९ ऑगस्टलाच मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने 'भारत छोडो'च्या प्रेरणेने शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रीमंडळ भ्रष्टाचाराला गाढून टाकेल आणि विकासाची गंगा पुढे घेऊन जाईल असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
जुन्या नेत्यांना संधी देणं योग्य निर्णय आहे. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. गुवाहीमधील बैठकीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो आनंदाने मान्य करु असं सर्वांनी सांगितलं होतं. नवीन आमदार अजिबात नाराज नाहीत असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ असं ते म्हणाले होते. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आहे, अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही असे मोठं वक्तव्य केले.
भाजप-शिंदे गटातील या व्यक्ती घेणार शपथ आज सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, भाजपकडून 11 जण शपथ घेणार आहेत यामध्ये चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरिष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आदी नऊ नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित दोन नावांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, शिंदे गटातील 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊतांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना सोमवारी रात्री राऊतांनी हा दावा केला आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचं मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही, सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
Maharashtra Cabinet Expansion Live: ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली.
पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, शिंदे सरकारच्या या पहिल्या टप्प्यातीव मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना डावलण्यात आलं आहे. (Eknath Shinde Cabinet Expansion)
शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं
शिंदे गटाकडून –
तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.