devendra fadnavis eknath shinde ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपची रणनीती

बुधवारी भाजपची एक गोपनीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होईल, असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी नगरमध्ये संदीपान भूमरे यांच्या विजयानंतर भूमरे यांचं मंत्रिपद कुणाला मिळेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष कानडे

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर शकलं उडालेल्या भाजपला राज्यामध्ये डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे. त्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती येत आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयशाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बुधवारी भाजपची एक गोपनीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होईल, असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी नगरमध्ये संदीपान भूमरे यांच्या विजयानंतर भूमरे यांचं मंत्रिपद कुणाला मिळेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट

२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट

३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट

४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट

५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट

६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट

७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट

९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट

१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट

११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट

१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट

१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट

१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप

१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस

१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस

१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)

२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस

२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस

२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस

२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप

२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस

२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप

२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस

२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप

३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस

३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट

३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप

३४) बीड – बजरंग सोनवणे– शरद पवार गट

३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट

३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट

३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप

३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट

३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप

४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप

४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष

४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार

४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे

४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे

४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT