Ekanath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये नेमकं निर्णय कोणते त्याबद्दल थोडक्यात.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय…

  • राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.

  • धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

  • भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.

  • पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.

  • राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होणार आहे.

  • पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे.

  • सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाणार आहे.

  • नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा देण्यात येणार आहे.

  • वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात येणार असून सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

  • बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्यात आला आहे.

  • औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT