Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

कायद्याप्रमाणेच कारवाई होईल, राणेंच्या अटकेवर गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

नामदेव कुंभार

कायद्यानुसार आणि नियमांनुसार योग्य ती कारवाई होईल. पोलिस स्वतंत्र्यपणे त्यांचं काम करतील, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्याचं काम पोलिस प्रशासन नक्कीच करेल. परंतु शासन म्हणून आमची अशीही जबाबदारी आहे की, या असंतोषाची सुरुवात नेमकी कुठून झाली? कायदा सुव्यवस्था बिघडावायला जबाबदार कोण आहे? याचा शोध घ्यावा लागेल. आम्ही तो घेऊ. ती व्यक्ती कितीही मोठी असेल तरीही कायद्याप्रमाणेच कारवाई होईल, असे देसाई यांनी सांगितले.

शंभूराज देसाई म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिपदावर असणाऱ्या वक्तीला न शोभणारे आहे. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यापासून राणेंचं आभाळ दोन बोट ठेंगणं झाल्यासारखं वागण-बोलणं सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत. राज्यातील शिवसैनिकांच्या रोषाला नारायण राणे यांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की, राणे यांनी आपले शब्द मागे घ्यावेत. जर तसे नाही झालं तर शिवसैनिकांचा उद्रेक होईल, त्याला राणे जबाबदार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde:'विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब'; कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपने उडाली खळबळ..

Mumbai: हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय! अवाजवी मेंटेनन्स आणि वाढीव वीजबिलावर लगाम लागणार; सरकारची मोठी घोषणा

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनीत दहशतवादी हल्ला? दोन अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर जीवे मारण्याची धमकी, शिक्षकाचं ७ वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कारण काय?

SCROLL FOR NEXT