Ajit Pawar Portfolio Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Portfolio: अजित पवारांना अर्थ अन् मुंडे कृषिमंत्री, भाजप-शिंदे गटाच्या या मंत्र्यांना बसला मोठा फटका! पहा खातेवाटपाची संपूर्ण यादी

अजितदादांची सरशी, शिंदे गटाला मोठा धक्का पहा खातेवाटपाची संपूर्ण यादी

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिंदे-फडणवीस पवार सरकारमधील खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आजच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या खाते वाटपात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाकडील महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

खाते वाटपात शिवसेना मंत्र्यांची तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. कृषी, अन्न व प्रशासन आणि अन्य एक खातं राष्ट्रवादीला मिळालं आहे. तर मुख्यमंत्र्यांकडील परिवहन व अल्पसंख्याक खात शिवसेना मंत्र्यांना मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात आपल्या 8 नेत्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या 8 सहकाऱ्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने विरोध केला होता. त्यामुळे खाते वाटप रखडलं होतं. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

राज्यपाल रमेश बैस यांनी या बाबतची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या गटाला अत्यंत महत्त्वाची खाती मिळाली आहेत. अर्थ, सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा तसेच महिला व बालकल्याण आदी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत.(Latest Marathi News)

शिंदे-भाजप सरकारसोबत राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटपावरुन नाराजी नाट्य सुरू झाल्याचे चित्र दिसून आलं होतं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज अखेर हे चित्र स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लटकला, मात्र मंत्र्यांच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आता खातेवाटपाबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांना अखेर अर्थखातं मिळालं आहे. (Marathi Tajya Batmya)

कोणत्या नेत्याला कोणती खाती पहा यादी

अर्थ - अजित पवार

कृषी - धनंजय मुंडे

सहकार- दिलीप वळसे पाटील

वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ

अन्न नागरी पुरवठा - छगन भुजबळ

अन्न आणि औषध प्रशासन - धर्मराव अत्राम

मदत आणि पुनर्वसन - अनिल भाईदास पाटील

क्रीडा- संजय बनसोडे

महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे

आधीच्या मंत्र्यांकडे होती ही खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१) सामान्य प्रशासन,

२) नगर विकास,

३) माहिती व तंत्रज्ञान,

४) माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प),

५) परिवहन,

६) पणन,

७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,

८) मदत व पुनर्वसन,

९) आपत्ती व्यवस्थापन,

१०) मृद व जलसंधारण,

११) पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१) गृह

२) वित्त व नियोजन

३) विधी व न्याय

४) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण

५) ऊर्जा

६) राजशिष्टाचार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

सुरेश खाडे- कामगार

रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

अब्दुल सत्तार- कृषी

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT