BJP Maharashtra President Ravindra Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

Ravindra Chavan on Cabinet Reshuffle: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदल होणार? ; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले...

BJP Ravindra Chavan News: महायुतीमधील महामंडळ वाटपाचा निर्णय झालाय का? यावरही दिलं आहे उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Ravindra Chavan statement on Maharashtra cabinet reshuffle: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता, लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होवू शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत. शिवाय, महायुतीमधील एक नव्हे तर आठ मंत्री बदलले जाणार आहेत, असंही बोललं जात आहे. मंत्र्यांचे कारनामे बघता खरंच असं होवू शकतं, असंच सर्वांना वाटत आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष ब्लॅक अँण्ड व्हाईट मुलाखतीत याबाबत एक स्पष्ट विधान केलं आहे.

मुलाखतीत जेव्हा रविंद्र चव्हाणांना विचारलं गेलं की, आज सकाळापासून एक चर्चा सुरू आहे आणि त्यात म्हटलं जातय, की महायुतीमधील आठ मंत्री बदलले जाणार आहेत, लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. तर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहेत का? म्हणजे तुमच्या पक्षाकडून, महायुतीकडून काय अपेक्षित असं काही आहे?

यावर रविंद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं,  मला तर १०० टक्के वाटतं की नाही. बाकी आता सकाळापासूनच सुरू झालं नाही तर काल रात्रापासूनच सुरू झालं असं वाटायला लागलंय.. काय होतंय रोज कुणीतरी... मी म्हटलं तसं  की एक शब्द वर्तमानपत्रातून, मीडियातून आणि आमच्यातून सुरू झालेला आहे. कोणतातरी एखादा नरेटीव्ह काय सेट करावा, त्याचा एक कोणी ना कोणीतरी तयार करत असतो,  त्यापैकी एक असावा असं मला वाटतं.

याशिवाय, महायुतीमध्ये महामंडळाचं वाटप झालंय का? या प्रश्नावर बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, खरंतर यासंदर्भातील महायुतीच्या ज्या बैठका होतात, त्या बैठकांचा भाग मी कार्यध्यक्ष होतो तेव्हापासून मी होतो आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. महायुतीने त्यासंदर्भातील एक टीम तयार केलेली आहे.

महामंडळं एवढ्या मोठ्याप्रमाणात असतात की, कोणती महामंडळ वरिष्ठ पातळीची आहेत.. त्याबाबतचा सर्व विचार आम्ही सर्वजण करत आहोत आणि मग त्यानंतर येणाऱ्या काळात लवकरच या सगळ्या गोष्टी, कोणती मंडळ कोणत्या पक्षाला मिळावीत किंवा काय करता येईल, यासंदर्भात आम्ही सर्वजण समन्वय समिती एकमताने विचार करणार आहोत. त्यानंतर वरिष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील. सध्या तरी आम्ही विभागणीवर काम करत आहोत. परंतु लवकरच हे मार्गी लागेल आणि निर्णय घेतले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT