parambir singh esakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंह खंडणी प्रकरण : 2 पोलीस निरीक्षकांना अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांच्याविरोधात दाखल अनेक गुन्ह्यंचा तपास सीआयडी (CID) करत आहे. आरोपींनी पैशांचा व्यवहार केल्याचे सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना सोमवारी अटक केली. मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यानी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर सीआयडीने ही अटक केली आहे. त्या दोघांनाही मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजेरी

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना स्टेट सीआयडीने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. स्टेट सीआयडीकडून दोन्ही आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. आरोपींनी तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच मकोका अंतर्गत कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयेंची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील मुख्य आरोपी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात नाँन बेलेबल वाँरटं जारी केलं आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीना ७ दिवसा़ची कस्टडी सुनावली

या प्रकरणात परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती. तसेच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याच प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. अग्रवाल यांनी उसने पैसे घेऊन कोरके यांना ५०लाख दिले. याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही याप्रकरणातील चौथी अटक आहे. यापूर्वी याप्रकरणी संजय पुनामिया व सुनील जैन यांना याप्रकरणी अटक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT