Chief Minister Eknath Shinde news sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde:विरोधकांच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया! म्हणाले, "२०१४ मध्ये ज्यांनी राहुल गांधीचा विरोध केला..."

इंडिया आघाडीकडून अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदेंनी यावर इंडिया आघाडीला टोमणा लगावला.

Manoj Bhalerao

Eknath Shinde on INDIA:नुकतीचं मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची अनौपचारिक बैठक पार पडली. यावेळी राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरचं देशाच्या बदनामीचा आरोप केला. इंडिया आघाडीकडून अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदेंनी यावर इंडिया आघाडीला टोमणा लगावला. विरोधकांमध्ये एकी नसून ते भीतीपोटी एकत्र आल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे सर्व विरोधक घाबरुन आणि स्वार्थापोटी एकत्र आले आहेत. देशाचा गौरव, सन्मान मोदी साहेब करतात. त्यांची बदनामी देशाची बदनामी. २०१४ साली याचं लोकांनी राहुल गांधींना विरोध केला होता. आज त्यांच स्वागत करतायेत"

यापुढे मुख्यमंत्री म्हणाले की, " बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम यांनी केलंय आणि जनता त्यांना लोकसभेत आणि विधानसभेत उत्तर देईल.हे सगळे एकत्र आलेत यातचं मोदीजींचा विजय आहे."(Latest Marathi News)

यावेळी मुख्यमंत्री यांनी विरोधकांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत टोमणा मारलाय.मुख्यमंत्री म्हणाले की, "पंतप्रधान पदाचा एक नेता देखील ठरवू शकले नाही. याच्यावरुन त्यांची एकी दिसून येते. ही त्यांना भरलेली धडकी आहे, पोटदुखी आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT