Eknath shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनाही सुट्टी असते! एकनाथ शिंदे गेले रजेवर कारण...

मुख्यमंत्री 3 दिवस सुट्टीवर असल्याची चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या कारणास्तव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (cm eknath shide goes on 3 days leave what are reason behind)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचार्‍यांना ते त्यांच्या गावी साताऱ्याला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती आहे.

३ दिवसांच्या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मुळ गावी साताऱ्याला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्याही भूवय्या उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लवकरच येणार आहे. या निकालावर अनेक गोष्टी निर्भर आहेत. कारण जर निकाल शिंदेच्या बाजूने लागला तर राज्यात असलेले सरकार कायम असणार आहे. जर निकाल एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लागला तर शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे. तर निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देखील शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तर राज्यातील सरकार कायम राहावं यासाठी भाजप प्लॅन बी करत आहे त्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपने अजित पवारांना सोबत घेण्याची चर्चा कदाचित शिंदे यांना पटली नसावी, त्यामुळे ते काही दिवस सुट्टीवर असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडींवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. खारघर दुर्घटनेत 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्याचबरोबर आता चर्चेत आलेला रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प यामुळेही स्थानिक आणि विरोधक आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत चालला होता. याच दबावातून देखील ते रजेवर असल्याची चर्चा होत असून विविध तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Shivam Associates Scam : 'शिवम'मध्ये महाराष्ट्रातील 10 हजार लोकांचे पैसे बुडाले? 'सीआयडी'च्या रडारवर सनी लिओनी, 2400 कोटींचा घोटाळा नेमका काय आहे?

Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई

T20 Mumbai League: सूर्यकुमार यादवचे अम्पायरसोबत भांडण; वानखेडे स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा, संघ हरला अन्...

SCROLL FOR NEXT