Shrikant Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप; राऊतांच्या आरोपावर CM शिंदे म्हणतात...

आपल्याला CM शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल, असं आश्वासन दिलं आहे. शिंदे म्हणाले, "राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची समिती निर्णय घेईल. राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी होईल. ही स्टंट बाजी आहे का हे ही तपासली जाईल. कोण विरोधीपक्षात आहे. याचा विचार न करता गरज असल्यास सुरक्षाही पुरवली जाईल."

खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी ठाण्यातल्या कुख्यात गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. या प्रकारानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT