Congress Sakal
महाराष्ट्र बातम्या

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनाच पसंती, महाराष्ट्र कॉंग्रेसने मंजूर केला ठराव

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणूकांबाबत आज महाराष्ट्र कॉंग्रेसची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीय दोन महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले असून यामध्ये राहुल गांधी यांनीकॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे असा विनंती ठराव मंजूर करण्यात आला. येत्या १७ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षात हालचालींना वेग आला आहे.

तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसने आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारावे यासोबतच दुसरा ठराव हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद आणि महाराष्ट्राची कार्यकारणी याची निवड राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी करावी असा ठराव देखील मंजूर करण्यात आला. हे दोन्ही ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. हे पद स्वीकारण्यास कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाची चर्चा सुरु होती. दरम्यान, गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या राजस्थान काँग्रेसने राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव मंजूर केला आहे.

इतर राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी ठराव मंजूर केले जात आहेत. यामुळे सध्यातरी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांचेच नाव आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारणार नाही असे जाहीर केले आहे, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या २० सप्टेंबरला अधिसूचना निघणार आहे. २४ ते ३० सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज भरले जातील तर आठ दिवसांमध्ये हे अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर १७ ऑक्टोबरला पक्षाध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

पोलिसांच्या मारहाणीत ५५ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?

Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

AAMIR KHAN FITNESS: 61 व्या वर्षी देखील आमिर खान फिट कसा? केबीसीच्या सेटवरच सांगून टाकलं गुपित, म्हणाला... 'मी रोज सकाळी उठून...'

Marathi News Live Updates : व्हिडीओ शूटिंगच्या वादातून तरुणाची गच्चीवरून फेकून हत्या

SCROLL FOR NEXT