congress  esakal
महाराष्ट्र बातम्या

क्रॉस वोटिंग, सत्तापालट; काँग्रेस हायकमांडने मागवला राज्याचा अहवाल

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अहवाल सादर काँग्रेसने करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर महाविसकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपसोबच आपलं सरकार स्थापन केलं. यानंतर नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं होतं. यावेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या ११ आमदारांना पक्षाने नोटीस पाठवली होती.

यानंतर आता या प्रकरणात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातलं असून काँग्रेसच्या केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचा अहवाल मागवला आहे. काँग्रेसच्या राजकीय घडामोडींचा अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(maharashtra congress political development report)

Congress

सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळलं गेलं असून मागच्या पंधरा वीस दिवसांतील राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. तर विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉसवोटिंग केल्याचा आरोप होत होता. पण त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन केलेल्या बंडामुळे नवं सरकार स्थापन झालं आणि नव्या सरकाचा बहुमत चाचणीचा कार्यक्रम विधानसभेत पार पडला.

त्यामध्ये काँग्रेसच्या ११ आमदार गैरहजर होते. या ११ आमदारांना पक्षाने नोटीस बजावण्यात आली असून यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाने या घडामोडीवर अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT