thorath.jpg
thorath.jpg 
महाराष्ट्र

स्थानिक निवडणुकांतही 'आम्ही' एकत्र येऊ शकतो : बाळासाहेब थोरात  

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : "राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊ शकतात,' असे सूतोवाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी केले.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना थोरात बोलत होते. महायुतीमध्ये दिलेला शब्द भाजपने न पाळल्याने शिवसेनेने मराठी बाणा दाखवून त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे सांगून थोरात म्हणाले, ""तिघांनी एकत्र येऊन सरकार करायचे असल्याने आणि पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी त्यातील बारकावे स्पष्ट करणे गरजेचे आहे. किमान समान कार्यक्रम व्यवस्थित करून काही शंका न ठेवता पुढे जाण्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. याबाबत दिल्लीतही दोन-तीन बैठका होतील, अशी अपेक्षा आहे. यात कदाचित चार दिवस जास्त जातील; पण जो निर्णय होईल तो व्यवस्थित होईल.'' 

विधानसभा निवडणुकांचे हिशेब सादर करण्याची मुदत संपत आल्याने बहुतांश आमदार मतदारसंघात असल्याने, आज होणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली. 

"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्‍याने राजकारणात रंगत आली. राजकारणात सर्व काही गांभीर्याने घेतले पाहिजे असे नाही. या वाक्‍याचा चांगला उपयोग राजकारण्यांपेक्षा सोशल मीडिया आणि पत्रकारांना झाला. भाजप सरकार पुन्हा येणार असल्याचा फडणवीस यांचा दावा म्हणजे "220 जागा येणार,' असे म्हणण्यासारखा आहे. 
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT