corona sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचे 97 टक्के रुग्ण बरे

सध्या राज्यात 62 हजार 452 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना (corona) झालेले 61 लाख 95 हजर 744 रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे (corona) रुग्ण बरे होणाऱ्याचे प्रमाण 97 टक्के आहे. राज्यात गेल्या वर्षी 9 मार्चपासून कोरोनाचे 63 लाख 96 हजार 805 जणांना कोरोना झाला. त्यापैकी 97 टक्के रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात 62 हजार 452 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या आजाराने आतापर्यंत एक लाख 35 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा मृत्यूदर सध्या 2.11 टक्के असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यात सोमवारी चार हजार १४५ नवीन रुग्णांचे निदान. त्यांच्यावर वेगवेगळ्या शहरात उपचार सुरू आहेत. दिवसभरात करोनाच्या शंभर रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

राज्यात आतापर्यंत पाच कोटी 11 लाख 11 हजार 895 प्रयोगशाळा नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 12.53 टक्के (63 लाख 96 हजार 805) नमूने पॉझिटीव्ह आले असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात सध्या तीन लाख 53 हजार 129 व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’मध्ये आहेत तर दोन हजार 530 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT