Corona Update maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Corona Update: राज्यात १११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, मृत्यूदर १.८१ टक्के

आज राज्यात १० हजार ४१५ कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचणी १६६५ आणि आरएटी चाचणी ८७५ झाल्या आहेत. आजचा पॉझिटिव्हीटी दर १.०६ टक्के आहे.

Sandip Kapde

Maharashtra Corona Update: भारतात पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाने पाय पसरवायला सुरुवात केली आहे.  राज्यात आज १११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आगे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.  

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात १११ कोरोना रुग्ण आढळले तर १३१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के आहे. मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे.

आज राज्यात १० हजार ४१५ कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचणी १६६५ आणि आरएटी चाचणी ८७५ झाल्या आहेत. आजचा पॉझिटिव्हीटी दर १.०६ टक्के आहे.

जेएन.१ व्हेरीएंट अपडेट-

सध्या राज्यात JN.1 चे १३९ रुग्ण आहेत. तर १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत १४१ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७०.९२ टक्के रुग्ण साठ वर्षावरील आहेत. तर ८४ टक्के सहव्याधी, १६ टक्के सहव्याधी नसलेले आहेत. (Latest Marathi News)

राज्यात ९११ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ८७० जण गृह विलीगीकरणात आहेत. तर रुग्णालयात दाखल असलेलेल रुग्ण ४१ आहेत. १२ रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT