Corona
Corona  esakal
महाराष्ट्र

Corona Update: राज्यात आज रुग्णसंख्या 40 हजारांच्या आत

कार्तिक पुजारी

- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update ) कमी होताना दिसत आहे

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update ) कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात 60 हजारांच्या पुढे कोरोना (Corona ) रुग्णसंख्या आढळून येत होती, आता ती 40 हजारांच्या आसपास आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 39 हजार 923 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 53 हजार 249 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 695 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 79,552 झाली आहे. आतापर्यंत राज्यात 53 लाख 09 हजार 215 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 47 लाख 07 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 19 हजार 254 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra Corona Update Active cases health ministry rajesh tope)

पुणे 3172 , अहमदनगर  2958,सोलापूर 2070,सातारा 2048,मुंबई 1660 येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्या ही वाढत असून आज दिवसभरात 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या  47,07,980 इतकी आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 88.68 % एवढे झाले आहे. राज्यात मृतांचा आकडा मात्र आज ही चढाच आहे. आज पुन्हा एकदा मृतांचा आकडा वाढला असून आज 695 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 62 मृत्यू नोंदवण्यात आले. तर सोलापूर 59,नागपूर मनपा 54,बीड 37 मृत्यू झाले.  मृत्यूचा दर 1.5 % इतका आह

आज नोंद झालेल्या 695 मृत्यूंपैकी 311 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 142 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 242 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,19,254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,09,215 (17.35 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT