Corona test sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला; जाणून घ्या सविस्तर माहिती

भाग्यश्री भुवड

मुंबई : एकीकडे कोरोनासह (corona) नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (omicron variant) सावट कायम असताना राज्यातील (Maharashtra) चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे (corona test decreases) समोर आले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त चाचण्या करून लवकरात लवकर निदान आणि उपचार केले (corona treatment) तर कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणता येईल. पण, राज्यातील चाचण्या कमी संख्येत होत आहेत. (corona test decreases in Maharashtra)

राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 20 डिसेंबर या दिवशी 83,656 चाचण्या केल्या गेल्या. त्यातून, 544 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, दैनंदिन पाॅझिटिव्हीटी दर 0.65 एवढा नोंद करण्यात आला होता. चाचण्यांचे हेच प्रमाण 19 डिसेंबर या दिवशी 111,913 एवढे होते. त्यामुळे, 20 डिसेंबर या दिवशी जवळपास 28 हजार चाचण्या कमी केल्या गेल्या.

राज्यात आतापर्यंत 7 कोटींहून अधिक कोविड चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्यात 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत दररोज  1 लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या. मात्र, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तोंडावर चाचण्या कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

चाचण्यांमध्ये चढ-उतार

राज्यातील दैनंदिन आकडेवारीनुसार, 1 डिसेंबर ते  5 डिसेंबरपर्यंत दररोज सरासरी 1 लाख 22 हजार चाचण्या करण्यात आल्या. हे प्रमाण 6, 7 , 13 आणि 20 डिसेंबर या दिवशी 70 ते 85 हजार दरम्यान होते. त्यामुळे, या कालावधीत चाचण्यांमध्येही चढ-उतार पाहायला मिळत आहे.

पाॅझिटिव्हीटी दर वाढला

राज्याचा 19 डिसेंबरपर्यंतचा पाॅझिटिव्हीटी दर सरासरी 1.19 वर पोहोचला आहे. जो 18 डिसेंबरपर्यंत 1.14 एवढा होता. तर त्याधी  साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दर 1.09 एवढा होता.

साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दर जास्त असलेले जिल्हे

पुणे, सांगली, सोलापूर, पालघर, सातारा, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दर सर्वाधिक आहे. पुण्यात सर्वाधिक 1.75 पाॅझिटिव्हीटी दर असून त्यापाठोपाठ सांगलीत 1.19, सोलापूर 1.17 , पालघर 1.16 , सातारा 1.13, नाशिक 1.06 आणि अहमदनगर 1.03 एवढा साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दर आहे. दरम्यान, राज्याचा साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दर 0.82 टक्के एवढा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT