ANI
महाराष्ट्र बातम्या

पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

नामदेव कुंभार

Maharashtra corona update : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. या जिल्ह्यांचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या पेक्षा जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्या विश्लेषणानुसार सात जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या आठवड्यात राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट घसरुन 3.05 टक्के इतका झाला आहे. 28 जुलै ते 3 ऑगस्ट या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.51 टक्के इतका होता. 4 ते 10 ऑगस्ट या आठवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.81 टक्के इतका होता. तर त्या आधीच्या आठवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6.38% इतका होता. अहमदनगर जिल्ह्याचा 4 ते 10 ऑगस्ट या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.27% टक्के इतका होता. तर त्याआधीच्या आठवड्यात नगरचा पॉझिटिव्हिटी रेट 5.98% इतका होता. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. मात्र, राज्याच्या सरासरी रेटपेक्षा जास्तच आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्येही घसरण पाहायला मिळाली. 4 ते 10 ऑगस्ट या आठवड्यात सांगली आणि सातारऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट अनुक्रे 6.63% आणि 6.12% इतका होता. तर त्याआधीच्या आठवड्यात त्यांचा पॉझिटिव्हिटी रेट अनुक्रमे 7.59% आणि 6.47% इतका होता. सोलापूरचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.4% तर बीड जिल्ह्याचा 4.24% इतका होता. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, केंद्रानं नुकतेच राज्यातील 37 जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात दररोजची कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची दररोजची रुग्णवाढही जास्त होत असल्याचं राज्याच्या कोरोना आकडेवारीवरुन दिसतेय.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची संख्या वाढली

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढली असून आतापर्यंत एकूण 65 रुग्णांची नोंद राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. बुधवारी आयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद केली. त्यामुळे, ही संख्या 65 वर पोहोचली आहे. रत्नागिरीतील एक मृत्यु वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT