Corona Media Gallery
महाराष्ट्र बातम्या

दिलासादायक; राज्यात दिवसभरात 15 हजार रुग्ण; 184 मृत्यू

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात १५ हजार ०७७ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३३ हजार ००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८% एवढे झाले झाले. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 53 हजार 367 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्यात दिवसभरात १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५० लाख ५५ हजार ०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ४६ हजार ८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार ३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १० हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT