कोरोना चाचणी 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील १३.७२ टक्के रुग्ण गंभीर, मृतांची संख्याही मोठी

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Coronavirus Update मुंबई : राज्यात कोरोनावरील उपचाराधीन रुग्णांपैकी ३२ हजार २५० जण वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. त्यापैकी १३.७२ टक्के रुग्ण गंभीर आहेत. पुण्यासह ठाणे शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक आहे.

आजपर्यंत (ता.७) ७४ हजार ९९५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३२ हजार २५० रुग्ण प्रत्यक्षात रुग्णालयांत दाखल आहेत. त्यातील चार हजार ४२४ (१३.७२ टक्के) रुग्ण गंभीर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर रुग्ण आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी २० हजार ४३७ (६३.३७ टक्के) लक्षणविरहित, सौम्य लक्षणांसहित आहेत, तर सात हजार ३८९ (२२.९१ टक्के) रुग्ण अतिदक्षता विभागातून बाहेर आले आहेत. मात्र, ते ऑक्सिजनवर आहेत.

गंभीर रुग्ण अधिक असल्याने मृत्यूही मोठ्या संख्येने होत आहेत. औरंगाबाद , कोल्हापूर आणि पुणे मंडळात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. नागपूर मंडळात मृत्यू नियंत्रणात आले आहेत. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून मृतांचा आकडा एक लाख ३३ हजार ७१७ वर पोहोचला आहे.

उपचाराधीन रुग्ण

१४, ९७४ - पुणे

७, ८६३ - सांगली

७,५१६ - सातारा

६,२२० - नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होता, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

SCROLL FOR NEXT