1 may 1960 sakal newspaper maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : नदीत रोषणाई, कैद्यांची सुटका; १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात काय घडलं होतं?

Formation of Maharashtra A Historic Midnight Declaration: तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मध्यरात्री १२ वाजता महाराष्ट्र प्रांताचा नकाशा प्रकाशित केला आणि उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं.

वैष्णवी कारंजकर

आज महाराष्ट्र दिन. ६५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र झाला. या दिवशी नक्की काय काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही ६५ वर्षांपूर्वीचा पेपर चाळला. आणि अनेक गोष्टी आढळल्या.

१ मे १९६० रोजी अखेर महाराष्ट्र हे नवं राज्य अस्तित्वात आलं. या दिवशी प्रकाशित कऱण्यात आलेला सकाळ आमच्या संग्रहातून आम्ही वाचकांपुढे आणत आहोत. या दिवशी नक्की काय काय घडलं होतं, जाणून घ्या या पेपरमधून...

भारताच्या राजकीय नकाशात महाराष्ट्र व गुजरात या दोन नव्या प्रांतांचा उदय

मध्यरात्री बारा वाजता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मध्यरात्री १२ वाजता महाराष्ट्र प्रांताचा नकाशा प्रकाशित केला आणि उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं, असा उल्लेख या दिवशीच्या सकाळच्या अंकात आहे. तसंच गुजरातचंही उद्घाटन यावेळी नेहरुंनी केलं.

Maharashtra Din

पुण्यात मिरवणूक, नदीत रोषणाई

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या निमित्ताने रात्री पुणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी संभाजीपासून नव्या पुलापर्यंत पुणे महापालिकेतर्फे नदीत एक हजार दिवे सोडण्यात आले. शनिवारवाड्यावर मिरवणूक पोहोचली आणि दारूकाम झालं. ही मिरवणूक अर्धा मैल लांबीची असल्याचं सकाळच्या अंकात म्हटलं आहे.

गरीबांना अन्नदान

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या निमित्ताने मध्यरात्रीपर्यंत विविध समाज आणि संस्थांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी गोरगरिबांना अन्नदानही करण्यात आलं. पानसुपारी, करमणुकीचेही कार्यक्रम झाले.

साडेचारशे कैद्यांची मुक्तता

आनंदोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून साडेचारशे कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. मात्र खुनाची शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याची शिक्षा कमी कऱण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका, शेतकऱ्यांना नाही दिलासा; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : गोकुळकडून गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Indian Cricket: द्रविडने नाकारला गंभीरचा 'सुपरस्टार कल्चर'चा दावा; म्हणाला, "कोणत्याही खेळाला हिरोची गरज आणि..."

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'हा' रस्ता २०२७ पर्यंत बंद; कोणत्या वेळेत वाहतूक सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT