Maharashtra Day sakal
महाराष्ट्र बातम्या

समाजातील अस्वस्थतेवर महाराष्ट्रदिनी प्रेमाची फुंकर

कला, सांस्कृतिक, साहित्यिक एकवटले

राजेश नागरे

नाशिक: समाजात दुहीचे वातावरण आक्रमकपणे आणि जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत, असे म्हणत कला, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्र एकवटले आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शांतता आणि संवाद यावर विश्‍वास दाखवण्यासाठी आणि दुही माजविण्याच्या घटनांबद्दलची अस्वस्थता प्रेमाच्या मार्गाने महाराष्ट्रदिनी (ता. १) व्यक्त केली जाणार आहे, असे या क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.

विविधतेत एकतेचा वारसा सांगणाऱ्या देशातील धर्मांमध्ये दुही माजवून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हल्ली हेतुपुरस्सर वरचेवर होत असलेले दिसत आहेत. आपल्या आसपासचा उन्माद, भय आणि सामाजिक ताण-तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याने आम्ही अस्वस्थ आणि व्यथित झालो आहोत. सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही मूल्ये आम्ही मानतो. समाजातील प्रश्न सोडविण्याचा मार्ग परस्पर संवादाचा असतो. याला अनुसरून शांततेच्या मार्गाने कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कुठल्याही संघटनेचा, पक्षाचा अथवा एका व्यक्तीचा नाही, तर सर्वांचा आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

कार्यक्रमातील सहभाग

प्रेमाच्या मार्गाने अस्वस्थता व्यक्त करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, लेखक अशोक शहाणे, समीक्षक वसंत आबाजी डहाके, सुधीर आणि शांता पटवर्धन, प्रभाकर कोलते, रंगनाथ पठारे, सुभाष अवचट, जयंत भीमसेन जोशी, प्रा. हरिश्‍चंद्र थोरात, लेखक डॉ. हरी नरके, अच्युत गोडबोले, रामदास भटकळ, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार विजेत्या डॉ. रझिया पटेल, ऊर्मिला पवार, संध्या नरे- पवार, भारतीय संगीत तज्ज्ञ नीला भागवत, राजन गवस, मुकुंद टाकसाळे, सुनील तांबे, सुमती लांडे, श्रीकांत देशमुख, सतीश तांबे, नीरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. राजीव नाईक, मकरंद साठे, नाटककार शफाअत खान, अभिनेते अतुल पेठे, सुनील सुकथनकर, अभिनेते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, इरावती कर्णिक, आलोक राजवाडे, निपुण धर्माधिकारी, गजानन परांजपे, आशिष मेहता, संदीप मेहता, मनस्विनी लता रवींद्र, अभिनेते अरुण कदम, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, डॉ. हमीद दाभोलकर, दत्ता पाटील, सचिन शिंदे, श्‍यामला चव्हाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT